भजनी मालिका
← भजनांकडे परत

जंव हें सकळ सिद्ध आहे । हात चालावया पाये । तंव तूं आपुलें स्वहित पाहें । तीर्थयात्रे जायें चुकों नको

janv hen sakal siddha ahe | hat chalavaya paye | tanv tun apulen svahit pahen | tirthayatre jayen chukon nako

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जंव हें सकळ सिद्ध आहे । हात चालावया पाये । तंव तूं आपुलें स्वहित पाहें । तीर्थयात्रे जायें चुकों नको ॥१॥ जंव काळ असे दुरी ठेला । तंव तूं हरीगुण गायें आइक वहिला । मनीं भाव धरूनि भला । न वंचें त्याला चुकों नको ॥२॥ जोडोनि धन न घलीं माती । ब्रम्हवृंदें पूजन इति । सत्य आचरण दया भूतीं । करीं सांगाती चुकों नको ॥३॥ दशा यौवन बाणली अंगीं । पांगिला नव्हें विषयसंगीं । काम क्रोध लोभ मोह त्यागीं । राहें संतसंगीं चुकों नको ॥५॥ मग तेथें न चले कांहीं । सत्ता संपदा राहेल ठायींच्या ठायीं। पुढें संचित जाईल ग्वाही । तुका म्हणे ते ही यमआज्ञा ॥५॥