भजनी मालिका
← भजनांकडे परत

जव या वायूचा प्रकाश तंव

jav ya vayucha prakash tanv

जव या वायूचा प्रकाश तंव या भंडियाचा विश्वासु । वायो निघोनियां गेला ठाईहुनि जाला उदासु रया ॥१॥ काळाचें भतुकें श्रृंगारिलें कौतुकें । जातसे तें देखे परी न चले कांहीं ॥२॥ ठाईचेचि जाणार कीं नव्हे राहणार यासी जतन ते काई । जेथील तेथें निमोनियां गेलें उपचार नचलेचि कांहीं ॥३॥ हें काळाचें भांडें कीं अवघेंचि लटिकें जैसें आहे तैसें सांगेन पुढती । बापरखुमादेविवरु विठ्ठलुचि सकळ जीवांचा सांगाती रया ॥४॥