भजनी मालिका
← भजनांकडे परत

जहज तारिलें तारिलें । शेवटीं उगमासी आलें

jahaj tarilen tarilen | shevatin ugamasi alen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
जहज तारिलें तारिलें । शेवटीं उगमासी आलें ॥१॥ भाव शिडासी लाविला । नाम फरारा सोडिला ॥२॥ कथा भरियेलें कोणें । घ्यारे नका दैन्यवाणें ॥३॥ एका मनाचा विसार । आधीं देउनी निर्धार ॥४॥ कोण देतो फुकासाठीं । आर्तभूत व्हावें पोटीं ॥५॥ आर्तभूत व्हारे । जनी म्हणे केणें घ्यारे ॥६॥