भजनी मालिका

भजने

घारीमुखींचा पिंड अंजनीच्या करीं । पडतां निर्धारीं भक्षियला ॥१॥ नवमास होतां जाली ती प्रसूत । दिव्य वायुसूत प्रगटला ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

घालितसे पंथ तरावया जना । गेले संदीपना घरीं दोघे ॥१॥ गुरुसेवा करिता वंदिती चरणा । जाहली संपूर्ण विद्या तेव्हां ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

घालितां उमाणीं पोरा नुमजति तुज । उकलूनियां हरि घेई हदईचें निज ॥१॥ असोनियां चराचरीं न दिसे तें काय । नाहीं जया कान डोळे मुख हात पाय ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

घालितां संतापायीं मिठी । पुर्वज वैकुंठी उद्धरती ॥१॥ ऐसा संतांचा महिमा । वानुं न शके शिवब्रह्मा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

घाली कवाड टळली वाड राती । कामें व्यापिलीं कां पडिली दुश्चित्ती । कोणे लागला गे सदैवेचे हातीं । आजि शून्य शेजे नाहीं दिसे पती वो ॥१॥

रचनाकार: संत तुकाराम

घाली देवावरी भार । आणिक न करी विचार । योगक्षेम निर्धार । चालवील तुझा ॥१॥ वाचे गाय नामावळी । वासुदेवीं वाहे टाळीं । प्रेमाचें कल्लोळीं । नित्यानंदें सर्वथा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

घालीतसे वेढे दिसतसे जळीं । आकांत सकळीं मांडियेला ॥१॥ गडी रडताती वत्स पळताती । कपाळ पिटिती सकळीक ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

घालुनियां भार राहिलों निश्चितीं । निरविलें संतीं विठोबासि ॥१॥ लावूनियां हात कुरवाळिला माथा । सांगितलें चिंता न करावी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

घालुनी आसन पोटीं भाव नाहीं । वायां केली पाही विटंबना ॥१॥ देव सर्वांभुतीं तयासी न कळे । वाउगें गवाळें पसरिलें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

घालुनी माया म्हणे नंदराया । भजे यादव राया कायावाचा ॥१॥ संसारसुख भोगाल चिरकाळ । परब्रह्मा निर्मळ तया भजे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

घालूनि आसन साधिला पवन । घेतलें जीवन अंतरिक्षीं ॥१॥ पराहस्तें तृप्ति नव्हे जी दातारा । कृपा करुणा करुणा करा केशिराजा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

घालूनियां फ़ांसा वोढी आपणाकडे । न येतां सांकडें घाली बहु ॥१॥ भजातियाचे निवारी आघात आपण । न भजतिया अकल्याण करी स्वयें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

घालूनियां मिठी करीत स्फ़ुंदन । न सोडी चरण विठोबाचे ॥१॥ कां रे मायबापा लावियेली सवे । ऐशी वां कां माव केली आतां ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

घालूनी लोळणी पडलों अंगणीं । सिंचा सिंचवणी तीर्थ वरी ॥१॥ वोल्हावेल तनु होईंल शीतळ । झाली हळहळ बहुतापें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम