भजनी मालिका
← भजनांकडे परत

घालूनियां ज्योती । वाट पाहें दिवसराती

ghaluniyan jyoti | vat pahen divasarati

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
घालूनियां ज्योती । वाट पाहें दिवसराती ॥१॥ बहु उताविळ मन । तुमचें व्हावें दरुषण ॥ध्रु.॥ आलों बोळवीत । तैसें या चि पंथें चित्त ॥२॥ तुका म्हणे पेणी । येतां जातां दिवस गणीं॥३॥