भजनी मालिका
← भजनांकडे परत

घाली देवावरी भार । आणिक न करी विचार । योगक्षेम निर्धार । चालवील तुझा

ghali devavari bhar | anik na kari vichar | yogakshem nirdhar | chalavil tujha

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
घाली देवावरी भार । आणिक न करी विचार । योगक्षेम निर्धार । चालवील तुझा ॥१॥ वाचे गाय नामावळी । वासुदेवीं वाहे टाळीं । प्रेमाचें कल्लोळीं । नित्यानंदें सर्वथा ॥२॥ सोस घेई कां रेक वाचे । रामकृष्ण वदतां साचें । धरणें उठतें यमाचें । निःसंदेह ॥३॥ शरण एका जनार्दनीं । करी रामनाम ध्वनी । कैवल्याचा दानीं । रक्षी तुज निर्धारें ॥४॥