भजनी मालिका
← भजनांकडे परत

घालूनी लोळणी पडलों अंगणीं । सिंचा सिंचवणी तीर्थ वरी

ghaluni lolani padalon anganin | sincha sinchavani tirtha vari

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
घालूनी लोळणी पडलों अंगणीं । सिंचा सिंचवणी तीर्थ वरी ॥१॥ वोल्हावेल तनु होईंल शीतळ । झाली हळहळ बहुतापें ॥ध्रु.॥ पावेन या ठाया कई झालें होतें । आलों अवचितें उष्ट्यावरी ॥२॥ तुका म्हणे कोणी जाणवा राउळी । येईल जवळी पांडुरंग ॥३॥