भजनी मालिका
← भजनांकडे परत

घालितां संतापायीं मिठी । पुर्वज वैकुंठी उद्धरती

ghalitan santapayin mithi | purvaj vaikunthi uddharati

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
घालितां संतापायीं मिठी । पुर्वज वैकुंठी उद्धरती ॥१॥ ऐसा संतांचा महिमा । वानुं न शके शिवब्रह्मा ॥२॥ इच्छिलें तें फळ । जन पावती सकळ ॥३॥ एका जनार्दनीं विश्वास । संत दासांचा मी दास ॥४॥