भजनी मालिका

भजने

एकचि हें तत्व एकाकार देशीं । एक तो ने-मेसी सर्व जनीं ॥१॥ ऐसें ब्रह्म पाहा आहे सर्व एक । न-लगे तो विवेक करणें कांहीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

एकटी येकला सर्व हें सकळां । आपणची जाला विश्वहरी ॥१॥ न कळे याची माव कैसा आहे भाव । सर्वांभूतीं देव गीता सांगे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

एकतत्त्व हरी निर्धार तूं धरी । प्रपंच बोहरी एका नामें ॥१॥ अच्युत गोविंद परमानंद छंद । नित्य तो आल्हाद हरिनामीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

एकंदर देवें आज्ञा केली । पुंडलिका दिधली निजभाक ॥१॥ जे जे तुझिया क्षेत्रासी येती । त्यां त्यां उत्तम गति पाठवीं ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

एकदां तरी दाखवा डोळां । तोचि वेळोवेळां आठवीन ॥१॥ सवरुप तुमचें पुरुषोत्तमा । अहो मनोरमा विश्वाचिया ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

एकदां श्रीकृष्ण खेळत असतां । प्रवेशे अवचिता गोपीगृहीं ॥१॥ दोहीं करीं तेव्हां नेत्र चोळीतसे । गोपी पुसते काय झालें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

एकपणें एक पाहतां जग दिसें । योगियांसि पिंसे सदा ज्यांचे ॥१॥ आनंद अद्वय नित्य निरामय । परापश्यंति वेगळा होय पंढरीये ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ