भजनी मालिका
← भजनांकडे परत

एकतत्त्व साधि तंव हारपलों तेथें

ekatattva sadhi tanv harapalon tethen

एकतत्त्व साधि तंव हारपलों तेथें । मज पाहतां येथें मी नाहीं ॥१॥ काय करुं सांगा कैसा हा आकळे । एकतत्त्वीं मिळे ह्रदयींगे बाईये ॥२॥ संपादनी नट नटोनियां हरि । एकरुपें करि आपण्या ऐसें ॥३॥ ज्ञानदेवींच तत्त्वसार हरी । चित्तानु लहरी झेपावली ॥४॥