भजनी मालिका
← भजनांकडे परत

एकदां जारे तेथवरी । पहा पुंडलीक हरी

ekadan jare tethavari | paha pundalik hari

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
एकदां जारे तेथवरी । पहा पुंडलीक हरी ॥१॥ जन्मा आलीया विश्रांती । निरसेल अवधी भ्रांती ॥२॥ विठ्ठलपायीं ठेवा भाळ । जन्म मग तुमचा सुफळ ॥३॥ पुंडलीकां नमस्कार । विनवणी जोडीन कर ॥४॥ म्हणे एका जनार्दनीं । पंढरी पुण्याची अवनी ॥५॥