भजनी मालिका
← भजनांकडे परत

एकदां तरी दाखवा डोळां । तोचि वेळोवेळां आठवीन

ekadan tari dakhava dolan | tochi velovelan athavin

रचनाकार: संत निळोबा · अभंग
एकदां तरी दाखवा डोळां । तोचि वेळोवेळां आठवीन ॥१॥ सवरुप तुमचें पुरुषोत्तमा । अहो मनोरमा विश्वाचिया ॥२॥ मग ती तुम्हां न करीं पीडा । संदेह येवढा निवारिल्या ॥३॥ निळा म्हणे अंतर जाणा । यदर्थी कृपणा नये होऊं ॥४॥