भजनी मालिका
← भजनांकडे परत

एकटी तूं गाणें गासी । दुजा शब्द उमटे पाशी

ekati tun ganen gasi | duja shabda umate pashi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
एकटी तूं गाणें गासी । दुजा शब्द उमटे पाशी ॥१॥ कोण गे तुझ्या बरोबरी । गाणें गाती निरंतरीं ॥२॥ पांडुरंग माझा पिता । रखुमाई झाली माता ॥३॥ ऐशियाच्या घरीं आलें । जनी म्हणे धन्य झालें ॥४॥