भजनी मालिका
← भजनांकडे परत

एकदां जेवितां नव्हे समाधान

ekadan jevitan navhe samadhan

रचनाकार: संत रामदास · अभंग
एकदां जेवितां नव्हे समाधान । प्रतिदिनीं अन्न खाणें लागें तैसें निरुपण केलेंचि करावें । परी न धरावें उदासीन प्रत्यहीं हा देहो पाहावा लागतो। शुध्द करावा तो रात्रंदिस प्रत्यहीं देहानें भोगलें भोगावें। त्यागिलें त्यागावें दास म्हणे।