भजनी मालिका
← भजनांकडे परत

एकपण पाहतां सृष्टी । भरली दृष्टी विठ्ठल

ekapan pahatan srushti | bharali drushti viththal

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
एकपण पाहतां सृष्टी । भरली दृष्टी विठ्ठल ॥१॥ नाहें द्वैताची भावना । बैसला ध्याना विठ्ठल ॥२॥ मीतुंपणा वोस ठाव । बैसला सर्व विठ्ठल ॥३॥ ध्यानीं विठ्ठल मनीं विठ्ठल । एका जनार्दनीं अवघा विठ्ठल ॥४॥