भजनी मालिका
← भजनांकडे परत

एकदां तरी देखिल्याविण । कैसेनि मी कोण ओळखें

ekadan tari dekhilyavin | kaiseni mi kon olakhen

रचनाकार: संत निळोबा · अभंग
एकदां तरी देखिल्याविण । कैसेनि मी कोण ओळखें ॥१॥ अमृताचि ऐकिल्या गोडी । रसने ते फुडी केंवि लाभे ॥२॥ क्षीराब्धी हे शेषश्यन । जगीं न देखोन अनोळखा ॥३॥ निळा म्हणे त्यापरि देवा । नये स्वानुभवा काय करुं ॥४॥