भजनी मालिका
← भजनांकडे परत

एकतत्त्व नाम दृढ धरी मना

ekatattva nam drudh dhari mana

एकतत्त्व नाम दृढ धरी मना । हरिसि करुणा येइल तुझी ॥१॥ तें नाम सोपेरे रामकृष्णगोविंद । वाचेशी सदद जपे आधीं ॥२॥ नामापरतें तत्त्व नाहीरे अन्यथा । वायां आणिका पंथा जाशी झणी ॥३॥ ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी । धरोनी श्रीहरि जपे सदां ॥४॥