भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुझाठायीं ओस । दोन्ही पुण्य आणि दोष

tujhathayin os | donhi punya ani dosh

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तुझाठायीं ओस । दोन्ही पुण्य आणि दोष ॥१॥ झडलें उरलें किती । आम्ही धरियेलें चित्तीं ॥ध्रु.॥ कळलासी नष्टा । यातिक्रियाकर्मभ्रष्टा ॥२॥ तुका म्हणे बोला । नाहीं ताळा गा विठ्ठला ॥३॥