भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुझें नाम मुखीं तयासी विपित्त । आश्चर्य हें चित्तीं वाटतसे

tujhen nam mukhin tayasi vipitta | ashcharya hen chittin vatatase

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तुझें नाम मुखीं तयासी विपित्त । आश्चर्य हें चित्तीं वाटतसे ॥१॥ काय जाणों देवा होसील निजला । नेणों जी विठ्ठला मायबापा ॥ध्रु.॥ भवबंधनाचे तुटतील फांसे । तें कां येथें असे अव्हेरिलें ॥२॥ तुका म्हणे माझें दचकलें मन । वाटे वांयांविण श्रम केला ॥३॥