भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुझिया विनोदें आम्हांसी मरण । सोसियेला शीण बहु फेरे

tujhiya vinoden amhansi maran | sosiyela shin bahu phere

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तुझिया विनोदें आम्हांसी मरण । सोसियेला शीण बहु फेरे ॥१॥ आतां आपणें चि येसी तें करीन । नाम हें धरीन तुझें कंठीं ॥ध्रु.॥ वियोगें चि आलों उसंतीत वनें । संकल्प हे मनें वाहोनियां ॥२॥ तुका म्हणे वर्म सांपडलें सोपें । गोवियेलों पापें पुण्यें होतों ॥३॥