भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुझा शरणागत झालों मी अंकित । करीं माझे हित पांडुरंगा

tujha sharanagat jhalon mi ankit | karin majhe hit panduranga

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तुझा शरणागत झालों मी अंकित । करीं माझे हित पांडुरंगा ॥१॥ पतितपावन तुझी ब्रीदावळी । ते आतां सांभाळीं मायबापा ॥ध्रु.॥ अनाथाचा नाथ बोलतील संत ऐकोनियां मात विश्वासलों ॥२॥ न करावी निरास न धरावे उदास । देईं याचकास कृपादान ॥३॥ तुका म्हणे मी तों पातकांची रासी । देईं पायापासीं ठाव देवा ॥४॥