भजनी मालिका
संत तुकाराम

संत तुकाराम

सतराव्या शतकातील देहूचे संत-कवी; तुकाराम गाथेचे कर्ते.

संत तुकारामांचे हजारो अभंग तुकाराम गाथेत संग्रहित आहेत. "ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस" असे वारकरी संप्रदायात म्हटले जाते.

या संतांची भजने

कीर्तन ऐकावया भुलले श्रवण । श्रीमुख लोचन देखावया ॥१॥ उदित हें भाग्य होईल कोणे काळीं । चित्त तळमळी म्हणऊनि ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कीर्तनाच्या सुखें सुखी होय देव । पंढरीचा राव संगीं आहे ॥१॥ भक्त जाय सदा हरी कीर्ति गात । त्यासेवें अनंत हिंडतसे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कुंभपाक लागे तयासि भोगणें । अवघा चि नेणे देव ऐसा ॥१॥ देव ऐसा ठावा नाहीं जया जना । तयासि यातना यमकरी ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

कुमुदिनी काय जाणे तो परिमळ । भ्रमर सकळ भोगीतसे ॥१॥ तैसें तुज ठावें नाहीं तुझें नाम । आम्ही च तें प्रेमसुख जाणों ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कुळधर्म ज्ञान कुळधर्म साधन । कुळधर्में निधान हाता चढे ॥१॥ कुळधर्म भक्ती कुळधर्म गति । कुळधर्म विश्रांति पाववील ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कुळाचे दैवत ज्याचें पंढरीनाथ । होईन दासीसुत त्याचे घरीं ॥१॥ शुद्ध यातिकुळवर्णा चाड नाहीं । करीं भलते ठायीं दास तुझा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कुशळ वक्ता नव्हे जाणीव तो श्रोता । राहे भाव चित्ता धरोनियां ॥१॥ धन्य तो जगीं धन्य तो जगीं । ब्रम्ह तया अंगीं वसतसे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम