भजनी मालिका
← भजनांकडे परत

कावळ्याच्या गळां मुक्ताफळमाळा । तरी काय त्याला भूषण शोभे

kavalyachya galan muktaphalamala | tari kay tyala bhushan shobhe

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कावळ्याच्या गळां मुक्ताफळमाळा । तरी काय त्याला भूषण शोभे ॥१॥ गजालागीं केला कस्तुरीचा लेप । तिचें तो स्वरूप काय जाणे ॥ध्रु.॥ बकापुढें सांगे भावार्थे वचन । वाउगा चि सीण होय त्यासी ॥२॥ तुका म्हणे तैसे अभाविक जन । त्यांसी वांयां सीण करूं नये ॥३॥