भजनी मालिका
← भजनांकडे परत

कांहीं च न लगे आदि अवसान । बहुत कठीण दिसतसां

kanhin cha na lage adi avasan | bahut kathin disatasan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कांहीं च न लगे आदि अवसान । बहुत कठीण दिसतसां ॥१॥ अवघ्याच माझ्या वेचविल्या शक्ती । न चलेसी युक्ती झाली पुढें ॥ध्रु.॥ बोलिलें वचन हारपलें नभीं । उतरलों तों उभीं आहों तैसीं ॥२॥ तुका म्हणे कांहीं न करावेंसें झालें । थकित चि ठेलें वित्त उगें ॥३॥