भजनी मालिका
← भजनांकडे परत

कासया व्हावें आम्ही जीवन्मुक्त । सांडुनियां थीत प्रेमसुख

kasaya vhaven amhi jivanmukta | sanduniyan thit premasukh

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कासया व्हावें आम्ही जीवन्मुक्त । सांडुनियां थीत प्रेमसुख ॥१॥ वैष्णवांचा दास झाला नारायण । काय त्या मिळोन असो सुखी ॥ध्रु.॥ काय त्या गांठीचें पडलें सुटोन । उगला चि बैसोन धीरु धरीं ॥२॥ सुख आम्हांसाठी केलें हें निर्माण । निर्दैव तो कोण हाणे लाता ॥३॥ तुका म्हणे मज न लगे सायुज्यता । राहेन या संतां समागमें ॥४॥