भजनी मालिका
← भजनांकडे परत

कांहीं एक तरी असावा आधार । कासयानें धीर उपजावा

kanhin ek tari asava adhar | kasayanen dhir upajava

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कांहीं एक तरी असावा आधार । कासयानें धीर उपजावा ॥१॥ म्हणविल्यासाठी कैसें पडे रुजु । धणी नाहीं उजू सन्मुख तो ॥ध्रु.॥ वेचल्या दिसांचा कोणावरी लेखा । घालावा हा सुखासुखा आम्हीं ॥२॥ नाहीं मनोगत तोंवरी देवा । तुका म्हणे सेवा नेघेजेतों ॥३॥