भजनी मालिका
← भजनांकडे परत

काशासाठीं आम्ही जाळिला संसार । न करा विचार ऐसा देवा

kashasathin amhi jalila sansar | na kara vichar aisa deva

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
काशासाठीं आम्ही जाळिला संसार । न करा विचार ऐसा देवा ॥१॥ कैसें नेणों तुम्हां करवतें उदास । माझा प्रेमरस भंगावया ॥ध्रु.॥ समर्पूनि ठेलों देह हा सकळ । धरितां विटाळ न लजा माझा ॥२॥ तुका म्हणे अवघी मोकलूनि आस । फिरतों उदास कोणासाठी ॥३॥