भजनी मालिका
संत तुकाराम

संत तुकाराम

सतराव्या शतकातील देहूचे संत-कवी; तुकाराम गाथेचे कर्ते.

संत तुकारामांचे हजारो अभंग तुकाराम गाथेत संग्रहित आहेत. "ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस" असे वारकरी संप्रदायात म्हटले जाते.

या संतांची भजने

आले हो संसारा तुम्ही एक करा । मुक्तीमारग हळू चि धरा । काळदंड कुंभयातना थोरा । कां रे अघोरा देखसी ना ॥१॥ नाहीं त्या यमासि करुणा । बाहेर काढितां कुडी प्राणा । ओढाळ सांपडे जैं धान्या । चोर यातना धरिजेतां ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

आलों उल्लंघुनि दुःखाचे पर्वत । पायांपाशीं हित तुमच्या तरी ॥१॥ न देखेचि लासा दुःखी होतें मन । कठिणें कठिण वाटतसे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आळवितां कंठ शोकला भीतर । आयुष्य वेचे धीर नाहीं मना ॥१॥ अझूनी कां नये हें तुझ्या अंतरा । दिनाच्या माहेरा पांडुरंगा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आळस पाडी विषयकामीं । शक्ती देई तुझ्या नामीं॥१॥ आणिक वचना मुकी वाणी । तुमच्या गर्जो द्यावी गुणीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आळिकरा कोठें साहातें कठिण । आपुला तें प्राण देऊं पाहे ॥१॥ सांभाळावें मायबापें कृपादृष्टी । पीडितां तो दृष्टी देखों नये ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आळी करावी ते कळतें बाळका । बुझवावें हें कां नेणां तुम्ही ॥१॥ निवाड तो तेथें असे पायांपाशीं । तुम्हांआम्हांविशीं एकेठायीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आवडी धरूनि करूं गेलों लाड । भक्तिप्रेमकोड न पुरे चि ॥१॥ म्हणऊनि जीव ठेला असावोनि । खेद होतो मनीं बहुसाल ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आवडी धरोनी आलेती आकारा । केला हा पसारा याजसाठी ॥१॥ तें मी तुझें नाम गाईंन आवडी । क्षण एक घडी विसंबेना ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आवडी न पुरे मायबापापासीं । घडों का येविसीं सकईंल ॥१॥ होईंल नेमलें आपुलिया काळें । आलीयाचें बळें आग्रहो उरे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आवडी न पुरे सेवितां न सरे । पडियेली धुरेसवें गांठी ॥१॥ न पुरे हा जन्म हें सुख सांठितां । पुढती ही आतां हें चि मागों ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आवडीचें दान देतो नारायण । बाहे उभारोनि राहिलासे॥१॥ जें जया रुचे तें करी समोर । सर्वज्ञ उदार मायबाप ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम