भजनी मालिका
← भजनांकडे परत

आवडीची सलगी पूजा । विषम दुजा भाव तो

avadichi salagi puja | visham duja bhav to

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आवडीची सलगी पूजा । विषम दुजा भाव तो ॥१॥ ऐसीं उफराटीं वर्में । कळों भ्रमें न येती ॥ध्रु.॥ न लगे समाधान मोल । रुचती बोल प्रीतीचे ॥२॥ तुका म्हणे एका जीवें । सूत्र व्होवें गुंतलें ॥३॥