भजनी मालिका
← भजनांकडे परत

स्तुति करूं तरी नव्हे चि या वेदा । तेथें माझा धंदा कोणीकडे

stuti karun tari navhe chi ya veda | tethen majha dhanda konikade

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
स्तुति करूं तरी नव्हे चि या वेदा । तेथें माझा धंदा कोणीकडे ॥१॥ परी हे वैखरी गोडावली सुखें । रसना रस मुखें इच्छीतसे ॥ध्रु.॥ रूप वर्णावया कोठें पुरे मती । रोमीं होती जाती ब्रम्हांडें हीं ॥२॥ तुका म्हणे तूं ऐसा एक साचा । ऐसी तंव वाचा जाली नाहीं ॥३॥