भजनी मालिका
← भजनांकडे परत

स्तुती अथवा निंदा करावी देवाची । अधम तो वेची व्यर्थ वाणी

stuti athava ninda karavi devachi | adham to vechi vyartha vani

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
स्तुती अथवा निंदा करावी देवाची । अधम तो वेची व्यर्थ वाणी ॥१॥ आइकोनि होती बहिर हे बोल । वेचूनि ते मोल नरका जाती ॥ध्रु.॥ इह लोकीं थुंका उडे तोंडावरी । करणें अघोरी वास लागे ॥२॥ तुका म्हणे माप वाचेऐसें निकें । भरलें नरकें निंदेसाठी ॥३॥