भजनी मालिका
← भजनांकडे परत

स्त्रियांचा तो संग नको नारायणा । काष्ठा या पाषाणामृत्तिकेच्या

striyancha to sang nako narayana | kashtha ya pashanamruttikechya

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
स्त्रियांचा तो संग नको नारायणा । काष्ठा या पाषाणामृत्तिकेच्या ॥१॥ नाठवे हा देव न घडे भजन । लांचावलें मन आवरे ना ॥ध्रु.॥ दृष्टिमुखें मरण इंद्रियाच्या द्वारें । लावण्य तें खरें दुःखमूळ ॥२॥ तुका म्हणे जरी अग्नि जाला साधु । परी पावे बाधूं संघष्टणें ॥३॥