भजनी मालिका
← भजनांकडे परत

स्तवूनियां नरा । केला आयुष्याचा मातारा

stavuniyan nara | kela ayushyacha matara

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
स्तवूनियां नरा । केला आयुष्याचा मातारा ॥१॥ नारायणचिया लोपें । घडलीं अवघीं चि पापें ॥ध्रु.॥ जीव ज्याचें दान । त्याचा खंडूनियां मान ॥२॥ तुका म्हणे वाणी । आइके त्या दोष कानीं ॥३॥