भजनी मालिका
← भजनांकडे परत

सांडावी हे भीड अधमाचे चाळे । मद्यपीर बरळे भलत्या छंदें

sandavi he bhid adhamache chale | madyapir barale bhalatya chhanden

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सांडावी हे भीड अधमाचे चाळे । मद्यपीर बरळे भलत्या छंदें ॥१॥ ऐसे तंव तुम्ही नाहीं जी दिसत । कां हें अनुचित वदलेती ॥ध्रु.॥ फांटा झाला त्यासी नाहीं वोढा वारा । बेरसा चा खरा हा तो गुण ॥२॥ तुका म्हणे नाहीं ज्याच्या बापा ताळ । तो देखे विटाळ संतां अंगीं ॥३॥