भजनी मालिका
← भजनांकडे परत

सांडियेली काया । वरी ओंवाळूनी पायां

sandiyeli kaya | vari onvaluni payan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सांडियेली काया । वरी ओंवाळूनी पायां ॥१॥ शरण शरण नारायणा । मज अंगीकारा दीना ॥ध्रु.॥ आलों लोटांगणीं । रुळें तुमचे चरणीं ॥२॥ तुका म्हणे शीर । ठेवियेलें पायांवर ॥३॥