भजनी मालिका
← भजनांकडे परत

सांगा दास नव्हें तुमचा मी कैसा । ऐसें पंढरीशा विचारूनि

sanga das navhen tumacha mi kaisa | aisen pandharisha vicharuni

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सांगा दास नव्हें तुमचा मी कैसा । ऐसें पंढरीशा विचारूनि ॥१॥ कोणासाटीं केली प्रपंचाची होळी । या पायां वेगळी मायबापा ॥ध्रु.॥ नसेल तो द्यावा सत्यत्वासी धीर । नये भाजूं हीर उफराटे ॥२॥ तुका म्हणे आम्हां आहिक्य परत्रीं । नाहीं कुळगोत्रीं तुज विन ॥३॥