विषयीं अद्वये । त्यासी आम्हां सिवो नये
vishayin advaye | tyasi amhan sivo naye
विषयीं अद्वये । त्यासी आम्हां सिवो नये ॥१॥ देव तेथुनि निराळा । असे निष्काम वेगळा ॥ध्रु.॥
सतराव्या शतकातील देहूचे संत-कवी; तुकाराम गाथेचे कर्ते.
vishayin advaye | tyasi amhan sivo naye
विषयीं अद्वये । त्यासी आम्हां सिवो नये ॥१॥ देव तेथुनि निराळा । असे निष्काम वेगळा ॥ध्रु.॥
vishayin visar padila nihshesh | angin bramharas thasavala
विषयीं विसर पडिला निःशेष । अंगीं ब्रम्हरस ठसावला ॥१॥ माझी मज झाली अनावर वाचा । छंद या नामाचा घेतलासे ॥ध्रु.॥
vishtha bhakshi taya amrut parikhen | vongalasi sakhen vongalachi
विष्ठा भक्षी तया अमृत पारिखें । वोंगळसी सखें वोंगळाची ॥१॥ नये पाहों कांहीं गोहवाडीचा अंत । झणी ठाका संत दुर्जनापें ॥ध्रु.॥
vishnudasan bhog | jari amhan pidi rog
विष्णुदासां भोग । जरी आम्हां पीडी रोग ॥१॥ तरि हें दिसे लाजिरवाणें । काय तुम्हांसी सांगणें ॥ध्रु.॥
vishnumay jag vaishnavancha dharma | bhedabhedabhram amangal
विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म । भेदाभेदभ्रम अमंगळ ॥१॥ अइका जी तुम्ही भक्त भागवत । कराल तें हित सत्य करा ॥ध्रु.॥
vishnumay sarva vaishnavansi thaven | yerannin vahave bhar mathan
विष्णुमय सर्व वैष्णवांसी ठावें । येरांनीं वाहावे भार माथां ॥१॥ साधनें संकट सर्वांलागीं शीण । व्हावा लागे क्षीण अहंभाव ॥ध्रु.॥
visarale kul apula achar | pati bhave dir ghar soy
विसरले कुळ आपुला आचार । पती भावे दीर घर सोय ॥१॥ सांडिला लौकिक लाज भय चिंता । रातलें अनंता चित्त झाले ॥२॥
vit neghe aisen randha | jenen badha upaje na
वीट नेघे ऐसें रांधा । जेणें बाधा उपजे ना ॥१॥ तरीच तें गोड राहे । निरें पाहे स्वयंभ ॥ध्रु.॥
vir viththalache gadhe | kalikal payan pade
वीर विठ्ठलाचे गाढे । कळिकाळ पायां पडे ॥१॥ करिती घोष जयजयकार । जळती दोषांचे डोंगर ॥ध्रु.॥
vruksha valli amhan soyarin vanacharen | pakshi hi susvaren alaviti
वृक्ष वल्ली आम्हां सोयरीं वनचरें । पक्षी ही सुस्वरें आळविती ॥१॥ येणें सुखें रुचे एकांताचा वास । नाहीं गुण दोष अंगा येत ॥ध्रु.॥
vrutti bhumi rajya dravya uparjiti | jana tya nishchitin dev nahin
वृत्ति भूमि राज्य द्रव्य उपार्जिती । जाणा त्या निश्चितीं देव नाहीं ॥१॥ भाडेकरी वाहे पाठीवरी भार । अंतरींचें सार लाभ नाहीं ॥ध्रु.॥
vruttivari amhan yenen kashasathi | evadhi he ati sosavaya
वृत्तीवरी आम्हां येणें काशासाठी । एवढी हे आटी सोसावया ॥१॥ जाणतसां परी नेणते जी देवा । भ्रम चि बरवा राखावा तो ॥ध्रु.॥
vechaven ten jiven | puja ghade aisha naven
वेचावें तें जीवें । पूजा घडे ऐशा नावें ॥१॥ बिगारीची ते बिगारी । साक्षी अंतरींचा हरी ॥ध्रु.॥
vethi aisa bhav | na kari ahach upav
वेठी ऐसा भाव । न करी अहाच उपाव ॥१॥ रूप ठसवी न जिवा । अवघा ये च ठायीं हेवा ॥ध्रु.॥
vedavalin kay karaven ya kalin | mhane vanamali gopalansi
वेडावलीं काय करावें या काळीं । म्हणे वनमाळी गोपाळांसि ॥१॥ गोवर्धन धरूं शिरी उचलूनि । म्हणे तुम्ही कोणी भिऊं नका ॥२॥
vediya upachar karitan sohale | kay sukh kale tayasi ten
वेडिया उपचार करितां सोहळे । काय सुख कळे तयासी तें । अंधापुढें दीप नाचती नाचणें । भक्तीभावेंविण भक्ती तैसी ॥१॥
vedin ten vedin bahut chi vedin | chakhatan godi chavi nene ||dhru.
वेडीं तें वेडीं बहुत चि वेडीं । चाखतां गोडी चवी नेणे ॥ध्रु.॥ देहा लावी वात । पालव घाली जाली रात ॥१॥
veden vankuden gain | pari mi tujha chi mhanavin
वेडें वांकुडें गाईन । परि मी तुझा चि म्हणवीन ॥१॥ मज तारीं दिनानाथा । ब्रीदें साच करीं आता ॥ध्रु.॥
ved anant bolila | artha itulachi shodhila
वेद अनंत बोलिला । अर्थ इतुलाचि शोधिला ॥१॥ विठोबासी शरण जावें । निजनिष्ठा नाम गावें ॥ध्रु.॥
ved jaya gati | amhan tayachi sangati
वेद जया गाती । आम्हां तयाची संगति ॥१॥ नाम धरियेलें कंठीं । अवघा सांटविला पोटीं ॥ध्रु.॥