भजनी मालिका
संत तुकाराम

संत तुकाराम

सतराव्या शतकातील देहूचे संत-कवी; तुकाराम गाथेचे कर्ते.

संत तुकारामांचे हजारो अभंग तुकाराम गाथेत संग्रहित आहेत. "ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस" असे वारकरी संप्रदायात म्हटले जाते.

या संतांची भजने

वैष्णवमुनिविप्रांचा सन्मान । करावा आपण घेऊं नये ॥१॥ प्रभु जाला तरी संसाराचा दास । विहित तयासी यांची सेवा ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

वैष्णवां संगती सुख वाटे जीवा । आणीक मी देवा कांहीं नेणें ॥१॥ गायें नाचें उडें आपुलिया छंदें । मनाच्या आनंदें आवडीनें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

वैष्णवांची कीर्ती गाइली पुराणीं । साही अठरांजणीं चहूं वेदीं ॥१॥ ऐसे कोणी दावा ग्रंथांचे वाचक । कर्मठ धार्मिक पुण्यशील ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

वैष्णवांची याती वाणी जो आपण । भोगी तो पतन कुंभपाकीं ॥१॥ ऐशी वेदश्रुती बोलती पुराणें । नाही ती दुषणें हरीभक्तां ॥ ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

वोखटा तरी मी विटलों देहासी । पुरे आतां जैसी जोडी पुन्हां ॥१॥ किती मरमर सोसावी पुढती । राहिलों संगती विठोबाचे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

व्यभिचारिणी गणिका असता कुंटणी । विश्वासतिचे मनीं राघोबाचा ॥१॥ ऐसी ही पापिणी वाइली विमानी । अचळ भुवनीं ठेवियेली ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

व्याल्याविण करी शोभनतांतडी । चार ते गधडी करीतसे ॥१॥ कासया पाल्हाळ आणिकांचे देखी । सांगतां नव्हे सुखी साखरेसि ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

व्हावया भिकारी हेंचि आम्हां कारण । अंतरोनि जन व्हावें दुरी ॥१॥ संबंध तुटावा शब्दाचा ही स्पर्श । म्हणऊनि आस मोकलिली ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

शंख करिशी ज्याच्या नांवें । त्याचें तुज नाहीं ठावें । ऐक सांगतों एका भावें । सांपडे घरीं तें जीवउनि खावें रे विठ्ठल ॥१॥ टिळे माळा करंडी सोंग । धरुनि चाळविलें जग । पसरी हात नाहीं त्याग । दावी दगड पुजी भग रे विठ्ठल ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम