भजनी मालिका
संत तुकाराम

संत तुकाराम

सतराव्या शतकातील देहूचे संत-कवी; तुकाराम गाथेचे कर्ते.

संत तुकारामांचे हजारो अभंग तुकाराम गाथेत संग्रहित आहेत. "ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस" असे वारकरी संप्रदायात म्हटले जाते.

या संतांची भजने

विठ्ठल भीमातीरवासी । विठ्ठल पंढरीनिवासी । विठ्ठल पुंडलिकापासीं । कृपादानाविसीं उदार ॥१॥ विठ्ठल स्मरणा कोंवळा। विठ्ठल गौरवीं आगळा । आधार ब्रम्हांडा सकळा । विठ्ठल लीळाविग्रही ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

विठ्ठल माझा जीव विठ्ठल माझा भाव । कुळधर्म देव विठ्ठल माझा ॥१॥ विठ्ठल माझा गुरु विठ्ठल माझा तारूं । उतरील पारु भवनदीचा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

विठ्ठल विठ्ठल येणें छंदें । ब्रह्मानंदें गर्जावें ॥१॥ वाये टाळ टाळ्याटाळी । होईल होळी विघ्नांची ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

विठ्ठल सोयरा सज्जन विसांवा । जाइन त्याच्या गांवा भेटावया ॥१॥ सीण भाग त्यासी सांगेन आपुला । तो माझा बापुला सर्व जाणे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

विठ्ठल सोयरा सज्जन सांगाती । विठ्ठल या चित्तीं बैसलासे ॥१॥ विठ्ठलें हें अंग व्यापिली ते काया । विठ्ठल हे छाया माझी मज ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

विठ्ठलनामाचा नाहीं ज्या विश्वास । तो वसे उदास नरकामध्यें ॥१॥ तयासी बोलतां होईल विटाळ । नव जाये तो जळस्नान करितां ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

विठ्ठला रे तूं उदाराचा राव । विठ्ठला तूं जीव जगाचा या ॥१॥ विठ्ठला रे तूं उदाराची रासी । विठ्ठला तुजपाशीं सकळसिद्धी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

विठ्ठलावांचोनि ब्रम्ह जें बोलती । वचन तें संतीं मानूं नये ॥१॥ विठ्ठलावांचूनि ज्या ज्या उपासना । अवघा चि जाणा सम्रचि तो ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

विद्या अल्प परि गर्वशिरोमणि । मजहुनि ज्ञानी कोणी आहे ॥१॥ अंगीं भरे ताठा कोणाते मानीना । साधूची हेळणा स्वयें करी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

विनंति घातली अवधारीं । मज देई वो अभय करीं । पीडिलों खेचरीं । आणीक वारी नांवांची ॥१॥ रंगा येई वो । एकला रंग वोढवला । हरीनामें उठिला । गजर केला हाकारा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

विनवितों चतुरा तुज विश्वंभरा । परियेसी दातारा पांडुरंगा ॥१॥ तुझे दास ऐसें जगीं वाखाणिलें । आतां नव्हे भलें मोकलितां ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

विनवितों तरी आणितोसि परी । याचकानें थोरी दातयाची ॥१॥ आमुचे ही कांहीं असों द्या उपकार । एकल्यानें थोर कैचे तुम्ही ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम