भजनी मालिका
← भजनांकडे परत

विनवितों तरी आणितोसि परी । याचकानें थोरी दातयाची

vinaviton tari anitosi pari | yachakanen thori datayachi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
विनवितों तरी आणितोसि परी । याचकानें थोरी दातयाची ॥१॥ आमुचे ही कांहीं असों द्या उपकार । एकल्यानें थोर कैचे तुम्ही ॥ध्रु.॥ न घ्यावी जी कांहीं बहु साल सेवा । गौरव तो देवा यत्न कीजे ॥२॥ तुका म्हणे नाहीं आमुची मिरासी । असावेंसी ऐसीं दुर्बळें चि ॥३॥