भजनी मालिका
← भजनांकडे परत

विठ्ठलनामाचा नाहीं ज्या विश्वास । तो वसे उदास नरकामध्यें

viththalanamacha nahin jya vishvas | to vase udas narakamadhyen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
विठ्ठलनामाचा नाहीं ज्या विश्वास । तो वसे उदास नरकामध्यें ॥१॥ तयासी बोलतां होईल विटाळ । नव जाये तो जळस्नान करितां ॥ध्रु.॥ विठ्ठलनामाची नाहीं ज्या आवडी । त्याची काळ घडी लेखिताहे ॥२॥ तुका म्हणे मज विठोबाची आण। जरी प्रतिवचन करिन त्यासी ॥३॥