भजनी मालिका
संत तुकाराम

संत तुकाराम

सतराव्या शतकातील देहूचे संत-कवी; तुकाराम गाथेचे कर्ते.

संत तुकारामांचे हजारो अभंग तुकाराम गाथेत संग्रहित आहेत. "ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस" असे वारकरी संप्रदायात म्हटले जाते.

या संतांची भजने

योग्याची संपदा त्याग आणि शांति । उभयलोकीं कीर्ती सोहळा मान ॥१॥ येरयेरांवरी जायांचें उसणें । भाग्यस्थळीं देणें झाडावेसीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

रक्त श्वेत कृष्ण पीत प्रभा भिन्न । चिन्मय अंजन सुदलें डोळां ॥१॥ तेणें अंजनगुणें दिव्यदृष्टि झाली । कल्पना निघाली द्वैताद्वैत ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

रंगलिया या रंगें पालट न घरी । सेवलें अंतरीं पालटेना॥१॥ सावळें निखळ कृष्णनाम ठसे । अंगसंगें कैसे शोभा देती ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

रचियेला गांव सागराचे पोटीं । जडोनि गोमटीं नानारत्नें ॥१॥ रत्न खणोखणी सोनियाच्या भिंती । लागलिया ज्योति रविकळा ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

रज्जु धरूनियां हातीं । भेडसाविलीं नेणतीं । कळों येतां चित्तीं । दोरी दोघां सारिखी ॥१॥ तुम्हांआम्हांमध्यें हरी । जाली होती तैसी परी । मृगजळाच्या पुरीं । ठाव पाहों तरावया ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

रडे अळंकार दैन्याचिये कांती । उत्तमा विपित्तसंग घडे ॥१॥ एकाविण एक अशोभ दातारा । कृपेच्या सागरा पांडुरंगा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

रणीं निघतां शूर न पाहे माघारें । ऐशा मज धीरें राख आतां ॥१॥ संसारा हातीं अंतरलों दुरी । आतां कृपा करीं नारायणा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

रत्नाच्या वोवणी कांचे ऐशा घरी । आव्हेरुनी दुरी अधिकारें ॥१॥ जातिस्वभाव आला डोळ्यां आड । तया घडे नाड न कळतां ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

रवि दीप हीरा दाविती देखणे । अदृश्य दर्षने संतांचीया ॥१॥ त्यांचा महिमा काय वर्णु मी पामर । न कळे तो साचार ब्रह्मादिकां ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

रवीचा प्रकाश । तोचि निशी घडे नाश । जाल्या बहुवस । तरि त्या काय दीपिका ॥१॥ आतां हाचि वसी जीवीं । माझे अंतरी गोसावीं । होऊं येती ठावीं । काय वर्में त्याच्यानें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

राउळासी जातां त्रास मानी मोठा । बैसतो चोहोटां आदरेशीं ॥१॥ न करी स्नान संध्या न म्हणे रामराम । गुरुगुडीचे प्रेम अहर्नीशी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

राजस सुंदर बाळा पाहों आलिया सकळा वो । बिबीं बिंबोनि ठेली माझी परब्रम्ह वेल्हाळा वो । कोटि रविशशि जिच्या अंगीचीया किळा वो ॥१॥ राजस विठाबाई माझें ध्यान तुझे पायीं वो । त्यजुनियां चौघींसी लावी आपुलिये सोई वो ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

राजा चाले तेथें वैभव सांगातें । हें काय लागतें सांगावें त्या ॥१॥ कोणी कोणा एथें न मनी जी फुका । कृपेविण एका देवाचिया ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम