भजनी मालिका
← भजनांकडे परत

रंगलिया या रंगें पालट न घरी । सेवलें अंतरीं पालटेना

rangaliya ya rangen palat na ghari | sevalen antarin palatena

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
रंगलिया या रंगें पालट न घरी । सेवलें अंतरीं पालटेना॥१॥ सावळें निखळ कृष्णनाम ठसे । अंगसंगें कैसे शोभा देती ॥ध्रु.॥ पवित्र जालें तें न लिंपे विटाळा । नैदी बैसों मळा आडवरी ॥२॥ तुका म्हणे काळें काळें केलें तोंड । प्रकाश अभंड देखोनियां ॥३॥