भजनी मालिका
← भजनांकडे परत

राजा चाले तेथें वैभव सांगातें । हें काय लागतें सांगावें त्या

raja chale tethen vaibhav sangaten | hen kay lagaten sangaven tya

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
राजा चाले तेथें वैभव सांगातें । हें काय लागतें सांगावें त्या ॥१॥ कोणी कोणा एथें न मनी जी फुका । कृपेविण एका देवाचिया ॥ध्रु.॥ शृंगारिलें नाहीं तगोंयेत वरी । उमटे लौकरि जैसे तैतें ॥२॥ तुका म्हणे घरीं वसे नारायण । कृपेची ते खुण साम्या येते ॥३॥