भजनी मालिका
← भजनांकडे परत

राजा करी तैसे दाम । ते ही चाम चालती

raja kari taise dam | te hi cham chalati

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
राजा करी तैसे दाम । ते ही चाम चालती ॥१॥ कारण ते सत्ता शिरीं । कोण करी अव्हेर ॥ध्रु.॥ वाहिले तें सुनें खांदीं । चाले पदीं बैसविलें ॥२॥ तुका म्हणे विश्वंभरें । करुणाकरें रक्षीलें ॥३॥