भजनी मालिका
← भजनांकडे परत

रवि दीप हीरा दाविती देखणे । अदृश्य दर्षने संतांचीया

ravi dip hira daviti dekhane | adrushya darshane santanchiya

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
रवि दीप हीरा दाविती देखणे । अदृश्य दर्षने संतांचीया ॥१॥ त्यांचा महिमा काय वर्णु मी पामर । न कळे तो साचार ब्रह्मादिकां ॥ध्रु.॥ तापली चंदन निववितो कुडी । त्रिगुण तो काढी संतसंग ॥२॥ मायबापें पिंड पाळीला माया । जन्ममरण जाया संतसंग ॥३॥ संतांचें वचन वारी जन्मदुःख । मिष्टान्न तें भूकनिवारण ॥४॥ तुका म्हणे जवळी न पाचारितां जावें । संतचरणीं भावें रिघावया ॥५॥