भजनी मालिका
← भजनांकडे परत

रवीचा प्रकाश । तोचि निशी घडे नाश । जाल्या बहुवस । तरि त्या काय दीपिका

ravicha prakash | tochi nishi ghade nash | jalya bahuvas | tari tya kay dipika

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
रवीचा प्रकाश । तोचि निशी घडे नाश । जाल्या बहुवस । तरि त्या काय दीपिका ॥१॥ आतां हाचि वसी जीवीं । माझे अंतरी गोसावीं । होऊं येती ठावीं । काय वर्में त्याच्यानें ॥ध्रु.॥ सवें असतां धणी । आड येऊं न सके कोणी । न लगे विनवणी । पृथकाची करावी ॥२॥ जन्माचिया गति । येणें अवघ्या खुंटती । कारण ते प्रीति । तुका म्हणे जवळी ॥३॥