भजनी मालिका
← भजनांकडे परत

रवि रश्मीकळा । नये काढितां निराळा

ravi rashmikala | naye kadhitan nirala

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
रवि रश्मीकळा । नये काढितां निराळा ॥१॥ तैसा आम्हां जाला भाव । अंगीं जडोनि ठेला देव ॥ध्रु.॥ गोडी साकरेपासुनी । कैसी निवडती दोन्ही ॥२॥ तुका म्हणे नाद उठी । विरोनि जाय नभा पोटीं ॥३॥