भजनी मालिका
संत तुकाराम

संत तुकाराम

सतराव्या शतकातील देहूचे संत-कवी; तुकाराम गाथेचे कर्ते.

संत तुकारामांचे हजारो अभंग तुकाराम गाथेत संग्रहित आहेत. "ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस" असे वारकरी संप्रदायात म्हटले जाते.

या संतांची भजने

भांडवल माझें लटिक्याचे गांठी । उदीम तो तुटी यावी हेचि ॥१॥ कैसी तुझी वाट पाहों कोण्या तोंडें । भोंवतीं किं रे भांडे गर्भवास ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

भांडवी माउली कवतुके बाळा । आपणा सकळां साक्षित्वेसीं ॥१॥ माझी माझी म्हणे एकएकां मारी । हे ती नाहीं दुरी उभयंता ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

भारवाही नोळखती या अनंता । जवळी असतां अंगसंगें ॥१॥ अंगसंगें तया न कळे हा देव । कळोनि संदेह मागुताला ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

भाव दावी शुद्ध देखोनियां चित्त । आपल्या अंकित निजदासां ॥१॥ सांगे गोपाळांसि काय पुण्य होतें । वांचलों जळते आगी हातीं ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

भाव धरी तया तारील पाषाण । दुर्जना सज्जन काय करी ॥१॥ करितां नव्हे नीट श्वानाचें हें पुंस । खापरा परीस काय करी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

भावनेच्या मुळें अंतरला देव । शिरला संदेह भय पोटीं ॥१॥ पोटीं होतें मागें जीव द्यावा ऐसें । बोलिल्या सरिसें न करवे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

भावबळें कैसा झालासी लाहान । मागें संतीं ध्यान वर्णियेलें ॥१॥ तें मज उचित करूनियां देवा । दाखवीं केशवा मायबापा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम