भजनी मालिका
← भजनांकडे परत

भाव तैसें फळ । न चले देवापाशीं बळ

bhav taisen phal | na chale devapashin bal

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
भाव तैसें फळ । न चले देवापाशीं बळ ॥१॥ धांवे जातीपाशीं जाती । खुण येरयेरां चित्तीं ॥ध्रु.॥ हिरा हिरकणी । काढी आंतुनि आहिरणी ॥२॥ तुका म्हणे केलें । मन शुद्ध हें चांगलें ॥३॥